•                   

मूत्रमार्गातील समस्या आणि आधुनिक तंत्रज्ञान

मूतखडे, प्रोस्टेट ग्रंथीची वाढ इ. समस्यांबद्दळ लोकांचे गैरसमजच जास्त असतात आणि त्यामुळे चुकीच्या उपचारांमुळे किडनी व मूत्रमार्गातील बिकार बळावतात. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये मूतखड्याच्या समस्या वाढतात. बऱ्याच लोकांचा मूतखड्यासाठी घरगुती उपचारांवरच भर असतो. परंतु हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. की, कुठल्याही गोळ्या-औषधांनी, काढ्यांनी मोठे खडे विरघणे हे अशक्य असतं. जे खडे तोडताना लोखंडी हत्यारेही तुटतात असे खडे कुठल्या काढ्यांनी कसे विरघळणार? उलट मूतखड्यांबर वेळीच वब परिणामकारक उपचार न झाल्याने खडे बाढतच जातात ब किडनीवर घातक परिणाम करून किडनी बादही करू शकतात. तसेच जे खडे अतिशय सोप्या पद्धतीने दुर्बिणीतून किंवा लिथोट्प्सीने काढण्यासारखे असतात ते नंतर अवघड शस्त्रक्रियेने काढावे लागतात. तसेच ज्या रुग्णांना प्रोस्टेट ग्रंथीचे अडथळे किंवा Stricture Urethra आजार असतो, अशा लोकांनी उपचार लांबविल्यास मूत्राशय ब किडनींवर त्याचा कायमस्वरूपी विपरित परिणाम होऊ शकतो. मूतखड्याच्या रुग्णांनी शस्त्रक्रियेविषयी असलेली भीती काढून टाकावी. कारण ९९% मूतखडे हे कुठलीही चिरफाड ब मोठे ऑपरेशन न करता अत्यंत सोप्या पद्धतीने काढता येतात. त्यामुळे वेळीच उपचार व शास्त्रोक्त पद्धतीने तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून समस्या सोडवाव्यात.किडनीतीळ किंबा गाविनीच्या वरच्या भागातील बरेच खडे हे लिथोस्ट्रप्सी (विना ऑपरेशन ध्वनिलहरींच्या कंपनाद्वारे) काढले जातात. त्यामध्ये कुठलीही शस्त्रक्रिया किंवा भूल लागत नाही तसेच रुग्णाला रुग्णालयात राहावेही ळागत नाही. विनाऑपरेशन उपचार असूनही ७५ ते ८०% खडे पूर्णपणे जाऊ शकतात. किडनीतीळ ९०% खडे आजकाल अतिशय सोप्या शस्त्रक्रियेने काढता येतात. RIRS आणि UltraminiPERC या पद्धतीने तर खड्यांच्या उपचारामध्ये क्रांती घडवली आहे. साधारणपणे ९.५ सेंटीमीटरच्या आतले किडनीतीळ खडे लघवीच्या मार्गातान लवचिक दुर्बिणीतून (Flexible Ureteroscope) लेझरने जाळून नष्ट करता येतात. तर २ ते २.५ सेंटीमीटरपर्यंत आकाराचे खडे पाठीतून ३-४ मिलीमीटरचे (पेनाच्या रिफिलच्या जाडीचे) छिद्र पाडून लेझरने जाळता येतात आणि खड्यांचे सर्ब कण त्याच छिद्रातून पूर्णपणे बाहेर काढता येतात. एखाद्या सुईएबढी जाडीला असणारीही दुर्बिण म्हणजे Biomedical Engineering ची कमाल आहे. त्यापेक्षा थोडे थोडे खडे (३.५ ते ४ सेंटीमीटर पर्यंतचे) हे ४-५ मिलीमीटरच्या छिद्रातून (miniPERC) लेझरने जाळून बाहेर काढता येतात. आपण जर मूतखड्यांचे १०० रुग्ण बघितले तर ९० ते ९५% खडे हे या आकाराचे असतात आणि इतक्या सोप्या पद्धतीने ते काढून रुग्ण ९-२ दिवसांत घरी जाऊन कामालाही लागू शकतो. या पेक्षा मोठे अगदी ९१९० ते १२ सेंटीमीटरपर्यंतचे खडेही ७-८ मिलीमीटरच्या छिद्रातून तुकडे करून बाहेर काढले जातात. (PCNL) या सर्व तंत्रज्ञानामुळे आजकाल चिरफाड करून शस्त्रक्रिया करण्याची वेळ अक्षरशः शंभरातून एखाद्याच रुग्णाला लागू शकते. गाविनी (युरेटर) मधीळ जवळजवळ सर्व खडे हे लघवीच्या मार्गातून दुर्बिणीतून लळेझरने जाळता येतात. लेझर तंत्रज्ञानामुळे हे खडे जवळजवळ नष्ट झाल्यामुळे मार्गातील नळ्या (DJ. Stent) ठेवायचीही गरज बऱ्याच रुग्णांना लागत नाही. साध्या पद्धतीने Lithoclast खडे तोडताना खडे किडनीकडे सरकून अर्धवट उपचार व्हायची शक्यता असते. लेझरमुळे ही समस्या खूपच कमीहोऊ शकते. लेझर तंत्रज्ञानाने प्रोस्टेट ग्रंथीच्या शस्त्रक्रियाही अत्यंत सुलभ झाल्याने रुग्ण एका दिवसातही घरी जाऊ शकतो. तसेच अगदी २०० ग्रॅमपर्यंत वाढलेल्या प्रोस्टेटच्या ग्रंथीसुद्धा थुलियम लेझरच्या साह्याने जास्त रक्तस्त्राव न होता काढल्या जाऊ शकतात व रुग्ण एक दिवसात घरीसुद्धा जाऊ शकतो. पण लेझर तंत्रज्ञानाबद्दल आपल्याकडे खूपच गैरसमज आहेत. दुर्बिणीतून केलेल्या कुठल्याही शस्त्रक्रियेला किंबा Lithotripsyलाही ळोक लेझर समजतात; पण लेझर ही एक प्रकारची प्रकाशज्योत आहे. जी दुर्बिणीतून एका तंतूमधून (Fibre) ही ऊर्जा आपल्याला खड्यापर्यंत पोहोचवावी लागते. या ऊर्जेमुळे खडे अक्षरशः जाळले जातात आणि त्याची धूळ होऊन जाते. या तंत्रज्ञानाची आणखी वैशिष्ट्ये म्हणजे ही ऊर्जा अतिसूक्ष्म अशा ०.२ मिलीमीटर तंतूमध्ये किंबा लवचिक दुर्बिणीतून तितक्याच क्षमतेने खडे जाळू शकते. ळेझर तंत्रज्ञा, अतिशय सूक्ष्म आकाराच्या दुर्बिण ब लवचिक (Flexible) दुबिर्णीमुळे मूत्रमार्गातील आजारावर अतिशय सुलभ, त्रास कमीत कमी होणारे ब अत्यंत परिणामकारक उपचार आता सामान्य माणसाळा अगदी सहज उपलब्ध झाले आहेत.

डॉ केतन वर्तक

Ms,Mch,DNB(Urology)

प्रमोदिनी यूरॉलॉजी फाउंडेशन व लेझर सेंटर

फर्ग्युसन कॉलेज रस्ता   वैशाली हॉटेलसमोर, पुणे ४.

फोन : 9822053645, 9763711267

Email:kpvartak@gmail.com

I am text block. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.